,

शिट्टी वाजली आणि प्रमोद अण्णा निम्हण यांच्या प्रचाराची गाडी सुसाट सुटली

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: January 4, 2026

प्रमोद अण्णा आगे बढो….. आता विरोधकांची शिट्टी वाजणार…. अशी ग्वाही देत प्रमोद निम्हण यांच्या प्रचाराला सुरुवात झाली.

राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर नागरिकांच्या आग्रहाने अपक्ष म्हणून निवडणुकीत आव्हान उभे करणाऱ्या प्रमोद निम्हण यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी प्रमोद निम्हण आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. पाषाण गावातील महिला भगिनींनी निम्हण यांना ओवाळून विजय होणार याची ग्वाही दिली. यावेळी विकासाची शिट्टी वाजणार असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी झालेल्या सभेत पाषाण, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकनिष्ठ काम करून देखील उमेदवारी नाकारून अन्याय केला आहे. बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याने आता विरोधकांची शिट्टी वाजवण्याची वेळ आली आहे. प्रमोद अण्णा निम्हण यांना विजयी करून विकासाची शिट्टी वाजणार असल्याची ग्वाही उपस्थितांनी यावेळी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading