कात्रज’ मधून शुभांगी जांभळे भाजपकडून इच्छुक

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: December 19, 2025

दोन दशके पक्षासाठी कार्यरत असल्याने प्रबळ दावा

पुण्यातील सर्वात मोठ्या आंबेगाव-कात्रज प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी शुभांगी दोडके-जांभळे यांनी प्रबळ दावा केला आहे.

गेली दोन दशके अव्याहतपणे पक्ष कार्य करीत असल्याने उमेदवारीसाठी आपला विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून इच्छुकांचा मुलाखती घेण्यात येत आहे. बालाजीनगर आंबेगाव-कात्रज या प्रभाग क्र ३८ मधील इच्छुकांच्या मुलाखती आज पक्षाकडून घेण्यात आल्या. या प्रभागात सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक असलेल्या शुभांगी जांभळे यांनी मुलाखत देताना उमेदवारीसाठी प्रबळ दावा केला. भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे त्यांनी आपला कार्यअहवाल सादर केला. तसेच या प्रभागातून लढण्याची संधी द्यावी अशी मागणी केली. उमेदवारी दिल्यास विजयी होऊ असाही दावा त्यांनी मुलाखती दरम्यान केला.

मूळच्या शिक्षिका असलेल्या शुभांगी दोडके- जांभळे या गेली वीस वर्षे भाजपमध्ये कार्यरत आहेत. पक्षवाढीसाठी काम करताना विविध कार्यक्रम, आंदोलनात त्या सहभागी झाल्या. सध्या मुख्याध्यापक म्हणून काम करीत असताना अनेक कुटुंबांशी त्यांचा थेट संपर्क येत असल्याने पक्षाला व पर्यायाने निवडणूक जिंकण्यास मदत होईल असा त्यांचा दावा आहे.

आंबेगाव- कात्रज प्रभागात त्यांचा व त्यांचे पती नितीन जांभळे यांचा दांडगा संपर्क आहे. मूळचे शेतकरी कुटुंब असलेल्या जांभळे यांचे नातेगोते व मित्र परिवार मोठा आहे. त्यांचा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असा उभयतांचा दावा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading