,

Big Breaking ! 500 कोटींचा कर परतावा घोटाळा

Author Picture
By onlyforpolitics2025 Published On: September 10, 2025

आयकर व्यावसायिकांच्या चौकशीत ५०० कोटी रुपयांचा कर परतावा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कर परताव्याचा हा गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा घोटाळा ठरला आहे.
अनेक दिवसांच्या गुप्त देखरेखीनंतर हाती आलेल्या माहितीच्या आधारे आयकर महानिदेशनालयाने (तपास) यांनी हा बनावट परतावा (Refund) घोटाळा शोधून काढला आहे.

या मोहिमेत पुण्यातील काही आयकर व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आले असून, पगारदार कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बनावट परतावा मिळविल्याचा संशय आहे. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या आयकर व्यावसायिकांनी पुण्यातील एका कार्यालयातून आपला व्यवसाय उभारला आणि प्रामुख्याने नामांकित खासगी कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील पगारदार कर्मचाऱ्यांना ग्राहक म्हणून जोडले.

गेल्या पाच वर्षांत त्यांनी १०,००० हून अधिक आयकर विवरणपत्रे (return) दाखल केली. आयकर विभागाने केलेल्या तपासातून असे समोर आले की, वजावटी (deduction) व सूट (exemption) यांचे दावे मोठ्या प्रमाणावर फुगवून दाखवले गेले. तसेच काही पूर्णपणे खोटे दाखल केले गेले, ज्यामुळे बेकायदेशीर परतावे मिळाले. या प्रक्रियेद्वारे जवळपास १०० कोटी रुपयांचे बनावट परतावे (रिफंड) मिळवले गेले आहेत.

या घोटाळ्याचा व्याप प्रचंड होता. हे काही वेगवेगळे प्रकरण नव्हते तर अनेक वर्षे चाललेली एक संघटित यंत्रणा होती,” असे तपासाशी संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले.
बनावट कर परताव्याची कार्यपद्धती निश्चित करताना या व्यावसायिकांनी स्वतःला “रिफंड स्पेशलिस्ट” म्हणून मांडले, ग्राहकांना असामान्यरित्या जास्त परतावे मिळवून देण्याचे आमिष दिले आणि त्यातील एक हिस्सा स्वतःजवळ ठेवला असे तपास यंत्रणेला असे आढळले आहे.

बहुतांश विवरणपत्रांमध्ये बनावट किंवा आधारहीन दावे करून कर परतावे मिळवले गेले. यामध्ये मुख्यत्वे, गृहनिर्माण कर्जावरील व्याज व मूळ हप्ता तसेच वैद्यकीय खर्च व विमा प्रीमियम,
बचत साधनांमधील गुंतवणूक,

शैक्षणिक कर्जावरील सूट, घरभाडे (HRA) यांचा समावेश आहे.
बहुतांश प्रकरणांमध्ये कोणतेही दस्तऐवजीकरण न करता सूट दाखवण्यात आली, विशेषतः मागील वर्षांच्या तपासणी प्रक्रियेमधील त्रुटींचा फायदा घेतला गेला असेही समोर आले आहे.
हे व्यावसायिक अशा आत्मविश्वासाने काम करत होते की बनावट दावे तपासणीखाली येणारच नाहीत आणि सहजपणे प्रणालीतून मंजूर होतील असेही निदर्शनास आले आहे.

या घोटाळ्यामुळे शासकीय तिजोरीला जवळपास ५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. हजारो बनावट परतावे मिळाल्याचे आढळले असून, यात सामील असलेल्या अनेक ग्राहकांवर दंड व खटले दाखल होण्याची शक्यता आहे.

“फक्त मध्यस्थावर जबाबदारी ढकलून करदाते स्वतःची जबाबदारी टाळू शकत नाहीत. त्यांच्या नावाने केलेले परताव्याचे दावे तपासले जातील आणि जेथे बनावट आढळतील तेथे कठोर कारवाई केली जाईल,” असे सूत्रांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading