,

कर्करोग, उद्योग क्षमता धोरणाबाबत महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 30, 2025

कर्करोग, उद्योग क्षमता धोरणा बाबत राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय

कर्करोग उपचार सर्व समावेशक धोरण,  महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्र बनविण्यासाठी विशेष धोरण, सौर कृषी पंपाला वीज पुरवठा देण्यास चालना, महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी… ते अनेक महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

मात्र सध्याच्या पूर परिस्थितीमध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात न आल्यामुळे विरोधकांकडून मंत्रिमंडळ बैठक आणि त्यामधील निर्णयांवर टीका होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे –

(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित. नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार.

त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित. राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार. यात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन होणार. कंपनीच्या भागभांडवलासाठी शंभर कोटींचा निधी.

(उद्योग विभाग)

महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र (ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर – GCC) धोरण २०२५ मंजुर. विकसित भारत २०४७ च्या वाटचालीस सुसंगत अशी वाटचाल व्हावी यासाठी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय सहकार्य या गोष्टीना प्रोत्साहन मिळणार.

(ऊर्जा विभाग)

औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी.

यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब व अन्य योजनेंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता निधी उपलब्ध होणार.

(नियोजन विभाग)

महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी. भू-स्थानिक तंत्रज्ञान (Geospatial Technology) चा वापर करून प्रशासनात गतिमानता आणणार. या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रात धोरणात्मक नियोजन करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत होणार.

(विधि व न्याय विभाग)

सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मंजूरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading