,

पुण्यातील प्रभाग रचना जाहीर, आता मतदार संपर्काचा दिवाळी धमाका!

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: October 4, 2025

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता शनिवारी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यामुळेच आता दिवाळीच्या निमित्ताने सर्वात प्रभागांमधील इच्छुक मतदार संपर्काची आतषबाजी करणार आहेत.

निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यापूर्वी हरकती आणि सूचना मागितल्या होत्या. त्यानंतर त्या संदर्भात सविस्तर सुनावणी आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी एकूण ५९२२ हरकती व सूचना सादर करण्यात आल्या. त्यापैकी १३२९ पूर्णतः मान्य करण्यात आल्या. तर ६९ अंशतः मान्य करण्यात आल्या. ४५२४ हरकती आणि सूचना पूर्णपणे फेटाळण्यात आल्या.

हरकती आणि सूचना पूर्ण किंवा अंशतः मान्य करण्यात आल्यामुळे खालील प्रभागांवर परिणाम झाला आहे. संबंधित प्रभाग क्रमांक – १ ४ १४ १५ १७ १८ २० २४ २६ २७ ३४ ३८ ३९

प्रभागाचे जुने नाव आणि प्रभागाचे नवीन नाव या प्रमाणे पुढील बदल झाले आहेत – कळस धानोरी – कळस धानोरी-लोहगाव उर्वरित

कोरेगाव पार्क मुंढवा – कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा

मांजरी बुद्रुक साडेसतरा नळी –

मांजरी बुद्रुक केशवनगर साडेसतरा नळी

रामटेकडी माळवाडी – रामटेकडी-माळवाडी- वैदुवाडी

बिबवेवाडी महेश सोसायटी – शंकर महाराज मठ – बिबवेवाडी

कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ –

कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल -के. ई. एम. हॉस्पिटल

गुरुवार पेठ घोरपडे पेठ – घोरपडे पेठ गुरुवार पेठ समताभूमी

आंबेगाव कात्रज – बालाजीनगर-आंबेगाव कात्रज

पुढील वर्षी २०२६ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading