,

मावळ तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आता एसआयटी 

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 26, 2025

पिंपरी चिंचवड झोन दोनचे उपयुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट मागील काळामध्ये उघडकीस आला होता. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी या घटनांचा सखोल तपास करण्यासाठी व या कटाच्या मागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड झोन दोन चे उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड झोन दोन चे उपायुक्त विशाल गायकवाड हे समितीचे प्रमुख असणार आहेत. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, पोलीस उप निरीक्षक रवींद्र खामगळ, पोलीस हवालदार अंकुश लांडे, सचिन बेंबाळे, सुनील सगर यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या कट प्रकरणातील काही आरोपींना हत्यारांसह पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जामिनावर ही आरोपी बाहेर सुटल्यानंतर पुन्हा तळेगाव परिसरामध्ये दिसून आल्याबाबत तक्रारी देखील दाखल झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये 4 जुलै रोजी लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयावर चर्चा करण्याची व तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी या बाबीची सखोल चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हे विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

याविषयी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले वरील घटनेच्या अनुषंगाने माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे. ती सर्व माहिती या समितीला मी देणार आहे. समितीने या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करावा व याच्या मुळाशी कोण आहे त्याचा शोध घ्यावा असे सांगितले. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर देखील रोख लावण्यासाठी कठोर अशी पावले उचलावीत.

….

तळेगाव दाभाडे या ठिकाणी यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिरिक्त तपास करण्यासाठी तसेच यामध्ये अन्य कुणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का याचा सखोल तपास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर आयुक्तांनी सोपविली आहे. –

विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ २, पिंपरी-चिंचवड

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading