जिल्हा बॅंकेच्या भरतीत गडबड झाल्यास याद राखा

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 26, 2025

अजित पवार यांचा सज्जड दम

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत होऊ घातलेल्या भरतीत गडबड झाल्यास खपवून घेणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.
जिल्हा बॅंकेत येत्या काही काळात एक हजाराहून अधिक पदांची भरती होणार आहे. या भरतीत सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा प्राधान्याने विचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, कृषीमंत्री व बॅंकेचे संचालक दत्तात्रेय भरणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.

बॅंकेच्या विविध १ हजार ८० जागांपैकी ३०० जागांवर भरती झाली आहे. येत्या काळात पावणेचारशे पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी आरबीआय, नाबार्ड व सहकार खात्याने काही निकष जाहीर केले आहेत. त्याप्रमाणे ही भरती होणार आहे. ही भरत करताना बॅंकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे पवार यांनी सांगितले. तथापि, ही भरती करताना काही गडबड झाली तर खपवून घेणार नाही, असा सज्जड दम त्यांनी संचालक मंडळाला दिला.

गेल्या आर्थिक वर्षात बँकेने केलेली कामगिरी आणि संचालक मंडळाच्या कारभाराचे कौतुकही करण्यासही पवार विसरले नाहीत. बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे यांनी यावेळी वार्षिक अहवाल सादर केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading