ओन्ली फॅार पॅालिटिक्स… पुणे : राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील हडपसर भागात आज जनसंवाद यात्रा काढली. या जनसंवाद यात्रेत त्यांनी रामटेकडी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिकांनी संवाद साधताना त्यांनी या भागात भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन रामटेकडीकरांना दिले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार चेतन तुपे, माजी नगरसेवक फारूक इनामदार, दीपक तांदळे, अशोक कांबळे आदी उपस्थित होते.जनसंवाद यात्रेदरम्यान अजितदादांनी दीपक तांदळे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आनंद लुटला.
शबरीची बोरे आणि सुदामाचे पोहे
यामध्ये वैदू वस्ती दलित वस्ती मुस्लिम बहुल वस्ती बहुजन समाजातील साध्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी नाश्ता जेवण अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व जल्लोष पाहायला मिळाला.
त्यानिमित्ताने दादांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम तर केलेच परंतु चौका चौकात गोरगरीब वस्तीत व सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी भोजन घेतल्यामुळे लोकांना रामराजाची व शबरीच्या बोरांच्या गोष्टीची तसेच श्रीकृष्ण व सुदामा च्या पोह्याची अनुभूती आली.



