अजित पवारांच्या जनसंवादात समस्यांचा महापूर

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: October 11, 2025

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला मतदारसंघात घेतलेल्या जनसंवाद यात्रेत नागरिकांकडून समस्यांचा पाढा वाचला गेला.

गेल्या काही वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या उपमुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी गर्दीचा महापूर उसळला होता. पिण्याचे पाणी, गटार, वीज, कचरा व्यवस्थापन, रस्ते तसेच समाविष्ट गावांत महापालिकेने लावलेला अवाजवी कर याबाबतच्या तक्रारी नागरिकांना मांडल्या.

खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा शहरी व ग्रामीण भाग असा संमिश्र आहे. गेली दोन दशके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत; तर भाजपचे आमदार भीमराव तापकीर हे या भागातून तीन वेळा निवडून आले आहेत. या दोन्ही लोकप्रतिनिधींचे मतदार संघात दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी वारजे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे या भागात घरोघरी भेटी दिल्या. तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेताना त्यांच्यासमवेत भेळ, पाणीपुरीचा आस्वादही घेतला.यावेळी त्यांच्या समवेत शुक्राचार्य वांजळे, दिलीप बराटे, बाबा धुमाळ, मारुती किंडरे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading