निगडी-चाकण मेट्रो मार्ग : उड्डाणपुलामुळे अडथळा? काढून टाका, अन्यथा प्रकल्पाला फटका

Author Picture
By onlyfor politics Published On: September 2, 2025

पिंपरी-चिंचवड : निगडी-चाकण मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोसाठी तयार करण्यात आलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) महा-मेट्रोकडून नुकताच सादर करण्यात आला. या अहवालाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान खास करून भोसरीतील विद्यमान उड्डाणपुलामुळे मेट्रो मार्गात अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. आवश्यक असल्यास तो पाडण्याची तयारी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

बैठकीतील चर्चेचे मुद्दे

निगडी-चाकण मेट्रो मार्ग नाशिक फाटा-भोसरी असा करण्यात यावा, तसेच गोडाऊन चौक-चाकण मार्गाप्रमाणेच संपूर्ण मार्गरचना करण्यात यावी.

भुजबळ चौक-वाकड या ठिकाणी मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर होईल, अशी योजना तयार करण्याचा भर.
मेट्रो स्टेशन परिसरात पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी.

बैठकीस उपस्थित मान्यवर

फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात झालेल्या या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे यांच्यासह महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, आयुक्त शेखर सिंह, महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ, शहर अभियंता मकरंद निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या मार्गांची तपासणी

बैठकीत भक्ती शक्ती चौक, मुकाई चौक, किवळे-भुजबळ चौक, वाकड-साई चौक, जगताप डेअरी-कोकणे चौक, नाशिक फाटा-संत तुकारामनगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रिक सेंटर आणि गोडाऊन चौक-चाकण या महत्त्वाच्या मार्गांच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाली.

८ दिवसांत अहवाल

महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी आठ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे आगामी काळात या मार्गाचे अंतिम रूप आणि रचना अधिक स्पष्ट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading