फडणवीस साहेब सावधान महाराष्ट्र तुमचाच नाही” आझाद मैदानावरून मनोज जरांगे यांचा इशारा

Author Picture
By onlyfor politics Published On: September 2, 2025

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांनी संतप्त भूमिका मांडली. “फडणवीस साहेब पोलिसांकडून आमच्यावर लाठीमार केला अटक करून घेतली तर त्याचा डाग तुमच्या आयुष्यभर जाणवेल कारण महाराष्ट्र तुमचाच नाही तुमच्याही लोकांना नेत्यांना याच महाराष्ट्रात यायचं आहे हे विसरू नका” असा थेट इशारा जरांगे यांनी दिला.

आझाद मैदानावर तणाव पोलिसांची नोटीस पण जरांगे ठाम

मुंबई उच्च न्यायालयात आंदोलकांच्या हुल्लडबाजी व अस्वच्छतेचा मुद्दा मांडल्यानंतर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना मैदान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे मात्र जरांगे ठाम आहेत . “मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही मागण्या मान्य झाल्याशिवाय उठणार नाही” असा निर्धार त्यांनी स्पष्ट केला .

“गोरगरीबांचा सन्मान करा नाहीतर” जरांगे म्हणाले “गोरगरीब मराठ्यांचा सन्मान केला तर ते तुम्हाला विसरणार नाहीत पण जर अपमान केला तर त्यांच्या डोक्यात बदला घेण्याची चीड निर्माण होईल त्यामुळे गोडीने प्रश्न सोडवा मराठे काय असतात हे पुन्हा एकदा दाखवावं लागेल असं होऊ देऊ नका. लढाई शांततेनेच पण शेवटपर्यंत.

जरांगे पाटलांनी आंदोलकांना संयमाचे आवाहनही केले

माझी तब्येत कितीही खराब झाली तरी तुम्ही शांत राहा काहीही झालं तरी हिंसक होऊ नका ही लढाई आपण शांततेने लढायची आणि जिंकायची आहे

मुख्य मुद्दे

आझाद मैदानावर उपोषणाचा पाचवा दिवस

मुंबई पोलिसांची मैदान रिकामं करण्याची नोटीस

फडणवीसांना थेट इशारा “तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे”

मागण्या मान्य झाल्याशिवाय जरांगे हटणार नाहीत

आंदोलन शांततेतच लढायचं पण शेवटपर्यंत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading