सर्वसामान्य संघ कार्यकर्त्यांबरोबरच संघ शताब्दी संचालनात सहभागी होण्यासाठी नेतेमंडळींकडून जय्यत तयारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी निमित्त देशभर अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमी निमित्ताने संघाचे होणारे संचलन आणि शस्त्रपूजन हे कायमच उल्लेखनीय उपक्रम ठरतो. यंदा संघ शताब्दी संचलनाच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आणि संघाशी संबंधित असलेले सर्व घटक या उपक्रमामध्ये आवर्जून सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांनी देखील नुकतेच अशा उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या संदर्भात आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माधुरी ताईंनी आपल्यावर झालेल्या संघ संस्काराबाबत गौरवोद्गार काढले.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये माधुरीताई म्हणतात…
“संघ शक्ती युगे युगे…”
समाज जीवनात काम करणारी प्रत्येक व्यक्ती एक स्वयंसेवकच असते. संघ हा समाज आणि सामाजिक आरोग्य जपणारा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे. देशाच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात संघ सर्व शक्तीनिशी देश व देशवासीयांसोबत उभा राहतो.
दसरा, अर्थात विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन मोठ्या उत्साहात साजरे होत असते. राष्ट्रसेविका समिती, पर्वती भागाच्या पथसंचलनात स्वयंसेविका म्हणून सहभागी होताना, आपण या वटवृक्षाचा एक भाग आहोत याचा प्रचंड अभिमान वाटतो! असेही त्या आवर्जून सांगतात.




