राजगड तालुक्यातील भात पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: September 30, 2025

राजगड तालुक्यातील भात पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे स्थानिक आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी नुकतीच पिकांची पाहणी केली.

या वेळी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच मौजे पासली ता. राजगड येथील पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये तालुकाध्यक्ष किरण राऊत, अमोल नलावडे, निर्मला जागडे, संतोषभाऊ रेणुसे, शिवाजी मरगळे, संदीप खुटवड,, अर्जुन भिलारे, गोपाळ इंगुळकर, निलेश खामकर, अरविंद केळतकर,  विलास शिळीमकर, रमेश शिंदे, अजित अनिल पवार, अंकुश तुपे, तानाजी कचरे, प्रमोद लोहकरे , सुधीर रेणुसे, संतोष डांगे आदींचा समावेश होता.

आपापल्या परिसरातील अतिवृष्टी पीक पाण्याच्या परिस्थितीचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रत्येक आमदार तयार करीत असून ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सादर करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्य शासन आणि इतर माध्यमातून आपापल्या परिसरातील शेतकऱ्याची अधिकाधिक कशी मदत करता येईल यावरही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा भर आहे, अशी माहिती आमदार मांडेकर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading