ओन्ली फॉर पॉलिटिक्स इम्पॅक्ट! संपूर्ण पुण्यातील बेकायदा फ्लेक्सवर धडक कारवाई

Author Picture
By Office Onlyforpolitics Published On: October 3, 2025

नोटीस बजावून कारवाई करणार- आयुक्त

बेकायदा फ्लेक्स लावून शहर विद्रूप करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे. यासंदर्भात ओन्ली फॉर पॉलिटिक्सने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्तांनी लगेचच त्याची दखल घेऊन कारवाईचा इशारा दिला आहे.

वारज्यात बेकायदा फ्लेक्स हटविण्याची जुजबी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच बेकायदा फ्लेक्स लावणाऱ्यांना कायदेशीर कारवाई बरोबरच दंडात्मक कारवाईही केली जाणार असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.

कारवाईची धूळफेक

-अधिकारी व मांडववाल्यांचे साटेलोटे

वारज्यातील माई मंगेशकर हॅास्पिटल ते आदित्य गार्डन रस्त्यावर उभारलेल्या बेकायदा फ्लेक्सवर आज महापालिकेने फक्त धूळफेक करणारी कारवाई केली.

या रस्त्यांच्या दुतर्फा उभारलेल्या बेकायदा फ्लेक्सवर कारवाई करताना एका स्थानिक नेत्याच्या भावाच्या वाढदिवसाच्या फ्लेक्सवर मात्र कारवाई करण्याची हिम्मत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना झाली नाही.

वारज्यातील मारुती मंदिर ते आदित्य गार्डन या रस्त्याच्या कडेला महापालिकेने लॅान विकसित केले आहे. या लॅानवरच खड्डे घेऊन मोठे फ्लेक्स उभारण्यात आले होते. या खड्ड्यांमुळे लॅानचे अतोनात नुकसान झाले. या फ्लेक्सवर आज सकाळी महापालिकेने कारवाई सुरू केली. मात्र ही कारवाई दिखावू असल्याचे नागरिकांना दिसले. बेकायदा फ्लेक्स फाडून ते अतिक्रमण विभागाचा गाडीत टाकण्यात आले. पण हे फ्लेक्स उभारलेल्या लोखंडी फ्रेम मात्र मांडववाल्यांना परत देण्याची मेहेरनजर या अधिकाऱ्यांनी दाखवली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बेकायदा फ्लेक्स हटविण्याची कारवाई सरसकट करण्याची ग्वाही वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. प्रत्यक्षात एका स्थानिक नेत्याच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त उभारलेल्या बेकायदा फ्लेक्सवर कारवाई करण्यास अधिकारी धजावले नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading