बिग बॉस हा भारतीय प्रेक्षकांचा आवडता आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो. सध्या सुरु असलेल्या बिग बॉस 19 मध्ये फक्त काही दिवस झाले असूनसुद्धा घरातील सदस्यांमध्ये वाद, भांडणं आणि ड्रामा रंगाला आला आहे. मात्र या सर्व गोंधळात सर्वाधिक चर्चेत आलेला विषय म्हणजे सलमान खानचा एका स्पर्धकावर अचानक फुटलेला राग. विकेंडच्या वारच्या भागात सलमान खानने स्पर्धक प्रणित मोरे याला चांगलाच सुनावले, आणि या घटनेने चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
घटनेचा सविस्तर आढावा:
बिग बॉसच्या घरातील प्रत्येक वीकेंडला होणारा ‘विकेंड का वार’ हा प्रेक्षकांसाठी मोठा आकर्षणबिंदू असतो. यात सलमान खान स्वतः घरातील सदस्यांना त्यांच्या वागणुकीबद्दल फीडबॅक देतो, त्यांचा क्लास घेतो आणि कधी कधी त्यांची प्रशंसा देखील करतो. पण या वेळी सलमानने विशेषतः प्रणित मोरेला लक्ष्य केले.
प्रणित मोरेने घरात राहून अनेक सहकलाकारांवर विनोद केले, ज्यात सलमान खान यांच्यावरही जोक्स होते. हे जोक्स सलमानना अजिबात रुचले नाहीत. त्यांनी प्रणितला थेट विचारलं .
“जर मी तुझ्या जागी असतो आणि तू माझ्या जागी असतास तर तुला हे विनोद आवडले असते का? फक्त लोकांना हसवण्यासाठी माझं नाव घेऊन इतकं खाली जाणं योग्य नाही.” या शब्दांवरून सलमानचा राग स्पष्टपणे जाणवत होता. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटिझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी प्रणितचा सपोर्ट केला, तर काहींनी त्याला “भाई, तुझं आता काम फसलं” अशा शब्दांत टोला लगावला.
प्रणित मोरेची लोकप्रियता आणि आव्हान:
मराठी चेहरा म्हणून प्रणित मोरेला बिग बॉसच्या घरात आणण्यात आले आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षक त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत. त्याचा गेम सध्या अनेकांना आवडतोय, पण सलमान खानसोबत झालेला हा वाद त्याच्या प्रवासाला नवा वळण देऊ शकतो. प्रणितने केवळ सलमानवरच नाही, तर इतर कलाकारांवरही विनोद केले आहेत, ज्यामुळे पुढच्या भागात अजून वाद उभे राहण्याची शक्यता आहे.




