लिपस्टिक ही स्त्रियांच्या मेकअपमधली सर्वात आवडती वस्तू मानली जाते. ऑफिस, फंक्शन, पार्टी किंवा अगदी साध्या दिवसातही लिपस्टिक चेहऱ्याचे सौंदर्य खुलवते. अनेक महिलांना लिपस्टिकचे कलेक्शन करणेही आवडते. मात्र, रोज लिपस्टिक वापरण्याची ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण यात असलेल्या रसायनांमुळे केवळ ओठच नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो.
लिपस्टिकमधील रसायने आणि त्यांचे घातक परिणाम
शिसेचे दुष्परिणाम :
बहुतेक लिपस्टिकमध्ये शिसे (Lead) नावाचा हानिकारक धातू असतो. हा हळूहळू शरीरात जमा होतो आणि हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या तसेच मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम करू शकतो.
ओठ काळे आणि कोरडे होणे :
लिपस्टिकमध्ये असलेले प्रिझर्वेटिव्ह्स आणि केमिकल्स ओठांचा नैसर्गिक ओलावा काढून टाकतात. यामुळे ओठ कोरडे, फाटलेले आणि हळूहळू काळे होतात. दररोज लिपस्टिक वापरल्याने ओठांचा गुलाबी रंग हरवतो.
शरीरात विषारी पदार्थांची साठवण :
लिपस्टिकमध्ये पॅराबेन्स, कॅडमियम, क्रोमियम यांसारखी रसायने असतात. ही शरीरात जमा होऊन विषबाधा करतात आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांची शक्यता वाढवतात.
ऍलर्जी आणि संसर्गाचा धोका :
काहींना लिपस्टिकमुळे ऍलर्जी, खाज, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवतात. विशेषतः स्वस्त किंवा लोकल उत्पादनांमुळे त्वचेवर संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
पचनसंस्थेवर परिणाम :
जेवताना किंवा पाणी पिता-पिता थोडी लिपस्टिक पोटात जाते. त्यातील रसायनांमुळे यकृत आणि पोटाला नुकसान होऊ शकते. पचनक्रिया बिघडू शकते व पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
दुष्परिणाम टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
नैसर्गिक व हर्बल लिपस्टिक वापरावी.
लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप बाम किंवा खोबरेल तेल लावावे.
झोपण्यापूर्वी लिपस्टिक पूर्णपणे स्वच्छ धुवावी.
रोजच्या वापराऐवजी कधीकधी नैसर्गिक लूक ठेवा किंवा हर्बल लिप बाम वापरावा.




