IT फ्रेशर्सना लाखोंचा चटका! नोकरीच्या आमिषाने कंपनी संचालकाकडून फसवणूक, पोलिसांनी उचलली मोठी कारवाई

Author Picture
By onlyfor politics Published On: September 3, 2025

पिंपरी : नोकरीच्या आमिषाने आयटी फ्रेशर्सना मोठा गंडा घालणाऱ्या फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. नोकरी देण्याच्या बहाण्याने 400 हून अधिक तरुणांकडून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात 23 ऑगस्ट रोजी पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सोमवारी (दि. 1 सप्टेंबर) आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला. राहुल शिंदे (24) यांच्या तक्रारीवरून कंपनीचे संचालक उपेश पाटील (37), रोहन अंबुलकर आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा घातला गंडा?

आरोपींनी जॉब प्लेसमेंटच्या नावाखाली प्रत्येक तरुणाकडून दीड ते अडीच लाख रुपये घेतले. काही दिवस ऑनलाईन प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही प्रकल्प न देता वेगवेगळी कारणे सांगून त्यांना कामावरून कमी केले. या पद्धतीने तब्बल 27 लाख 3 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांची धडक कारवाई

पहिल्या तक्रारीवरूनही कंपनीच्या संचालक उपेश रणजित पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. अनेक तरुणांना प्रशिक्षण शुल्काच्या नावाखाली एक ते अडीच लाख रुपये द्यावे लागले होते.

तपासात धक्कादायक आकडा

या फसवणुकीचा बळी ठरलेले आयटी फ्रेशर्स 400 पेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सध्या पोलिस आरोपींकडून चौकशी करत असून या गंडाळीचा आणखी मोठा विस्तार उघड होण्याची शक्यता आहे.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी Youtube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Discover more from Only For Politics

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading